प्रिय सभासद बंधू/भगिनी, सप्रेम नमस्कार.
अलीकडे वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातमीनुसार आपल्या मंडळाची "दत्ताजी ताम्हणे सभाग्रुह" ही वास्तू कदाचित कायद्याच्या कचाट्यात सापडून आपणास सोडावी लागेल, किंवा ती पाडली जाईल. अश्या परिस्थितीत आपणास तातडीने दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत आम्ही आपणास असे आवाहन करीत आहोत की, या नव्या वास्तूसाठी आपण सर्वांनी आम्हाला आर्थिक, किंवा नवीन जागा भाड्याने उपलब्ध करुन देण्यास मदत करावी. ज्याला जशी मदत करणे शक्य असेल त्याने आपापल्या परीने आम्हाला मदत करुन आमचे हात बळकट करावे ही नम्र विनंती! सोबत आपल्या पाच कार्यकारीणी सभासदांची नावे आणि फोन नं दिले आहेत. आपण लवकरात लवकर यापैकी कोणत्याही सभासदाशी संपर्क साधून आपली मदत करण्याची पध्दत आम्हास कळवावी. आपल्या सूचनांची आम्ही वाट पहात आहोत हे लक्षात ठेवा. धन्यवाद!!
सहाय्य करण्यासाठी संपर्क:
समीर नरेंद्र दळवी
9920026074
निलेश कारखानीस
9020146662
सुलेश कर्णिक
9004093490
बिपिन कुळकर्णी
9820074205
पंकज गडकरी
9867399262 |